वर्ध्यात डबीत सापडला मुघलकालीन खजिना; घरात खोदकामावेळी सापडलं नाण्यांसह 4 किलो सोनं...

          ❗❗मराठी तडका अपडेट❗❗

_______________________________________________
HOME | INSTAGRAM | FACEBOOK | YOU TUBE | _______________________________________________

वर्ध्यात डबीत सापडला मुघलकालीन खजिना; घरात खोदकामावेळी सापडलं नाण्यांसह 4 किलो सोनं... 


वर्धा: वर्धातील नाचणगाव येथे जुन्या घराचे खोदकाम करत असताना सोन्याचा खजिनाच सापडला आहे. खोदकामानंतर मातीचा ढिगारा शेतात टाकताना एका डबी सापडली. त्यात मुघलकालीन नाण्यांसह 4 किलो 28 ग्रॅम सोनं होतं. त्यात सोन्याचं बिस्किटही आढळून आलं. मुघलकालीन सोनं घरात सापडल्याची वार्ता कळल्यानंतर नाचणगाव येथे बघ्यांची एकच झुंबड उडाली. या घटनेचं वृत्त समजताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन हे सोनं ताब्यात घेतलं आहे. (historical gold coins worth Rs 20.54 lakh found in Maharashtra’s wardha)

वर्ध्याच्या नाचणगाव येथे शेतकरी सतीश चांदोरे यांनी जुने घर विकत घेतले होते. जुन्या घराचं खोदकाम त्यांनी सुरू केले. खोदकामातील मातीचा ढिगारा शेतात नेऊन टाकण्यात आला. दरम्यान हा ढिगाराही साफ करण्यात आला. हा कचरा साफ करताना मजुरांना एक डबी कचऱ्यात सापडली. डबीमध्ये सोनं आढळून आलं. त्यात एक सोन्याचं बिस्कीट आणि मुघलकालीन नाणे, कानातील रिंग असे एकूण 9 आभूषणे सापडली. 4 किलो 28 ग्रॅम वजनाचं हे सोनं असून त्याची आजची किंमत 20 लाख 54 हजार इतकी आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी हे सोन ताब्यात घेतलं. ही बाब पुरातत्व विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्याशी संपर्क साधत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.

शेतकऱ्याने सोनं घेताच, मजुरांची पोलिसांत धाव

शेतात सोनं सापडल्याची माहिती मिळताच शेतकरी चांदोरे याने मजुरांकडून हे सोने स्वतःकडे घेतले होते. परंतु, मजुरांनी पुलगाव पोलीस स्टेशन गाठले आणि सदर प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांना माहिती मिळताच शेतकऱ्याला गाठण्यात आले आणि सोने ताब्यात घेण्यात आले. मुघलकालीन नाणी यात सापडली असल्याने पुलगाव शहराच्या इतिहासाबाबत नवीन माहिती प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही नाणी इथे कशी आली? मुघलकाळातील कोणत्या राजाच्या काळातील ही नाणी आहे? त्या मागचा इतिहास काय आहे? आदींचा अभ्यास करण्यात पुरातत्व विभागाला मदत होणार असल्याचं रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं. दरम्यान, सोन्याचं घबाड सापडल्याने पंचक्रोशीत चर्चांना एकच उधाण आलं असून सोनं पाहण्याच्या उत्सुकतेने अनेकजण नाचणगाव गाठताना दिसत आहेत. (historical gold coins worth Rs 20.54 lakh found in Maharashtra’s wardha

❗❗मराठी तडका अपडेट❗❗

❗❗मराठी तडका अपडेट❗❗ मराठी माणसाच्या हक्काचे न्यूज पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने