छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ची आंदोलनाच्या दिशेने वाटचाल...

 छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आंदोलनाच्या दिशेने... 



"टाटा टी प्रिमियम" या चहापती कंपनीच्या मुर्खपणाने चक्क चहापती पॅकेट वर अखंड हिंदूस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा वापर चहापती पॅकेट वर करण्यात आला आहे, तरी तेच पॅकेट उद्या रिकामे झाल्यानंतर रस्तावर पडेल, कचर्यात उकिरड्यावर पडेल, जेणेकरून आमच्या दैवताची अपमान होत आहे. 
               हि सर्व बाबा छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या निदर्शनास आल्यानंतर छत्रपती प्रतिष्ठान ने याचा सक्त विरोध केला प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज सुर्यवंशी यांनी कंपनीच्या संपर्क अधिकार्यांना फोन करून याबाबत जाब विचारला संपर्क अधिकार्यांकडून दोन दिवसाचा वेळ मागितला गेला नंतर प्रतिष्ठान चे सं.अध्यक्ष पृथ्वीराज सुर्यवंशी यांनी १५ दिवसांनी परभणी येथील जिल्हाधिकार्यांना कंपनीवर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा छत्रपती प्रतिष्ठान संपूर्ण राज्य भर कंपनी विरोधात आंदोलन छेडेल असा इशारा देत निवेदन दिले, पण मुजोर कंपनीने याबाबत अजूनही काहीही केलेले नाही. 
आता खरच छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आंदोलनाच्या दिशेने वाटचाल सुरू करत आहे का अजून प्रतिष्ठान च्या अध्यक्षांकडून याबाबत अधिक माहिती मिळाली नाही. 

आता बघावे लागेल की छत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आंदोलनात खरच उतरेल का.

❗❗मराठी तडका अपडेट❗❗

❗❗मराठी तडका अपडेट❗❗ मराठी माणसाच्या हक्काचे न्यूज पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने