❗❗मराठी तडका अपडेट❗❗
_______________________________________________
PAN Card
जर नाव किंवा जन्मतारीख चुकीची असेल आणि आपण ती दुरुस्त करू इच्छित असाल तर आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून पॅनकार्ड, आधार कार्डप्रमाणे ऑनलाईन बदल करू शकता. PAN Card
नवी दिल्लीः शासकीय कामासह इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅनकार्ड (PAN Card) आवश्यक असते. विशेषत: केवायसीसाठी पॅनकार्डमध्ये दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु जर नाव किंवा जन्मतारीख चुकीची असेल आणि आपण ती दुरुस्त करू इच्छित असाल तर आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून पॅनकार्ड, आधार कार्डप्रमाणे ऑनलाईन बदल करू शकता. यासाठी आपल्याला काही प्रक्रियांचं पालन करावं लागेल. (These Things Can Be Changed Online With The Name In The PAN Card, Know The Whole Process)
कसे कराल नाव दुरुस्त?
1. पॅनकार्ड बदलण्यासाठी आपण NSDL किंवा UTI वेबसाईट https://tin.tin.nsdl.com/pan/correction.html वर भेट देऊ शकता.
2. “Application Type” पर्यायामधील “Changes or correction in existing PAN Data” या पर्यायावर क्लिक करा.
3. आता अर्जाची माहिती द्या आणि “Submit” वर क्लिक करा. यावेळी टोकन क्रमांक जारी केला जाईल, याद्वारे PAN Application पुढे जाईल.
4. केवायसीसाठी ईआयडी/आधार आणि इतर तपशिलांसारखी अनिवार्य माहिती भरा.
5. जर पॅनकार्डवर फोटो बरोबर नसेल तर स्वाक्षरी बदलण्यासाठी ‘Photo mismatch’ आणि ‘Signature Mismatch’ पर्याय निवडा आणि त्यानंतर आई-वडिलांचा तपशील भरा. यानंतर “Next” बटणावर क्लिक करा.
6. त्यानंतर ‘Address and Contact’ विभागाअंतर्गत तुमचा संपर्क क्रमांक व पत्ता यासारखी वैयक्तिक माहिती द्या.
7. वैयक्तिक माहिती नोंदविण्यासाठी अर्जदारास ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा आणि मृत्यूचा पुरावा द्यावा लागेल. याशिवाय अर्जदाराला त्याच्या पॅन वाटप पत्राची किंवा पॅन कार्डची प्रतही जोडावी लागेल.
8. आता सबमिट बटणावर क्लिक करा आणि पडताळणीसाठी सर्व पुरावा कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
9. छायाचित्र आणि स्वाक्षरीमध्ये बदल करण्यासाठी अर्जदारास फी भरावी लागेल. आपण घराच्या पत्त्यावर ऑर्डर केल्यास आपल्याला जीएसटीसह 101 रुपये द्यावे लागतील.
टोल फ्री नंबरवरून तुम्हाला मदत मिळू शकेल
पॅनकार्ड बदलण्याबाबत अधिक माहितीसाठी आपण 020-2721 8080 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. आपण इच्छित असल्यास आपण tininfo@nsdl.co.in वर इमेल देखील पाठवू शकता. पॅनकार्डची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही एसएमएस देखील करू शकता. यासाठी NSDL PAN<स्पेस> 15 अंकी पावती माहिती क्रमांक टाईप करा आणि 57575 क्रमांकावर पाठवा.
_________________________________________
___________❗❗जय महाराष्ट्र❗❗__________
__________________________________________