शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मार्फत रक्तदान शिबीर पार पडले
ठळक मुद्दा :
• सामाजिक बांधिलकी जपत "शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य" वाळवा तालुका यांच्या मार्फत आज सिद्धेश्वर मंदिर शिरगांव ,ता.वाळवा येथे रक्तदान शिबिर पार पडले.
सकाळी "शिवगंध प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य" वाळवा तालुका आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन सोहळा पार पडला तरी यात "शिवगंध प्रतिष्ठान" सांगली जिल्हा अध्यक्ष हर्षरजे आंबी, प्रसिध्दी प्रमुख प्रतीक रकटे(सोन्या भाऊ), कार्यअध्यक्ष ज्योतिरादित्य मुळीक, वाळवा तालुका प्रमुख यश पाटील, वाळवा तालुका उपप्रमुख ऋषिकेश कुलकर्णी व सर्व शिवभक्तांनी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी या वेळी उपस्थित राहून व रक्तदान करून विशेष योगदान दिले
या कार्यक्रमाचे आयोजन करताना विशेष योगदान या सर्वांनी केले त्याच्या नावे खालील प्रमाणे,
परमेश्वर (भाऊ) दूधसागर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, नामदेव शिंदे प्रदेश अध्यक्ष महा.राज्य, राजू इंगोले प्रदेश कार्यअध्यक्ष महा.राज्य, सूरज साळुंखे प्रदेश सचिव महा. राज्य, निलेश कदम प्रदेश संपर्कप्रमुख महा.राज्य, रामप्रसाद आडसकर प्रदेश सरचिटणीस महा. राज्य, स्वप्निल वालकर प्रदेश प्रसिद्धी प्रमुख महा. राज्य, रोहन गुंजाळ उपप्रसिद्धी प्रमुख महा.राज्य
व सर्व जनतेने मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रक्तदान शिबिर पार पाडले.