करोनावर गुळवेल' ठरतेय अमृत बघा सर्व माहिती......!

*करोनावर गुळवेल' ठरतेय अमृत*


 *गुळवेल किंवा गुडूची (शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले. भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी गुळवेल ही एक वेल आहे. हिला अमृतवेल म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे.     


'गुळवेल चे फायदे' :-
                             कॅन्सर, ज्वर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, नेत्र विकार, पंडुरोग, प्रमेह, मधुमेह, मूत्रविकार, यकृत विकार, रक्तशर्कराविकार, वमनविकार, संग्रहणी, सर्दी पडसे, हृदयविकार, आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.

गुळवेलीसंबंधी आयुर्वेदातील उद्धरणेसंपादण


" गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ ...!!!"

गुळवेल ह्या वनस्पतीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. या नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती जिवंत राहते. भारतातील सर्व भागांत ही वनस्पती सहज आढळते. या वनस्पतीच्या उपयोगासंदर्भात विविध ऋषींनी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे, ती पुढीलप्रमाणे-

" पिबेद्वा षट्पलं सर्पिरभयां वा प्रयोजयेत् |
त्रिफलायाः कषायं वा गुडूच्या रसमेव वा ||"
- (चरकसंहिता)

" पिप्पला मधु संमिक्ष गुडूची स्वरसं पिबेत |
जीर्णा ज्वर कफ प्लहिका सारोचक नाशनम्‌ || "
-( भैषज्य रत्नावली )

" गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी |
संग्रहिणी कषायोष्णा लध्वी बल्याग्नि दीपनी ||
दोषत्रयामतृड्दाहमेहकासांश्च पाण्डुताम्‌ |
कामलाकुष्ठवातास्रज्वरकृमिवमीन्हरेत् |
प्रमेहश्वासकासार्शः कृच्छ्रहृद्रोगवातनुत् ||"
-(भावप्रकाश निघंटू )



❗❗मराठी तडका अपडेट❗❗

❗❗मराठी तडका अपडेट❗❗ मराठी माणसाच्या हक्काचे न्यूज पोर्टल

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने