मराठा समाजाचं ठरलं, 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार, पहिल्या मोर्चाचं ठिकाणही ठरलं!
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे.
बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. बीडमध्ये आज मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली. (Maratha Reservation cancelled by supreme court Maratha Morcha announced protest will start from Beed Maharashtra on 16th may said Vinayak Mete)
बैठकीत नेमकं काय ठरलं?
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर बीडमध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना उद्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन संपल्यावर 16 तारखेला मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मराठा संघटनांनी घेतलेल्या या भूमिकेकमुळं राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोर्चे काढणार असल्याची माहिती यावेळी विनायक मेटे यांनी दिली. पहिल्या मोर्चा मोर्चाची सुरुवात बीड मधून होणार आहे.
Tags
Maratha reservation